आता आई होण्याचं वयही ठरणार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प (वहीखातं) सादर केला यामध्ये निर्मला सीतारमण यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवलं, आता मुलींच्या आई होण्याच्या वयोमर्यादेवरही विचार करणार असल्याचं अर्थमंत्री सीतारमण यांनी स्पष्ट केलं

निर्मला सीतारमण म्हणाल्या, “आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्यात आलं होतं. आता आमचं सरकार मुलींच्या आई होण्याच्या वयावरही विचार करत आहे. यासाठी एका ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली जाईल. ही टास्क फोर्स 6 महिन्यांमध्ये या विषयावरील आपला अहवाल सादर करेल.”

Leave a Comment