जेएनयूवरील हल्ला वेदनादायी, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांची खंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। जेएनयूमधील अनेक विद्यार्थ्यांवर शनिवारी सायंकाळी काही गुंडांकडून जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आलं. देशभरात या घटनेचे संतप्त पडसाद उमटत असून समाजकारण, राजकारण यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींकडून निषेधाच्या प्रतिक्रिया बाहेर येत आहेत. जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी झालेला प्रकार वेदनादायी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

विद्यापीठ संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचंही जयशंकर म्हणाले आहेत. जयशंकर यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देखील या घटनेवर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, जेएनयूतील छायाचित्रं भयानक आहेत.

मला आठवतय की जेएनयू पूर्वी एक अशी जागा होती जिथे वाद-विवाद आणि आपली मत मांडली जायची मात्र, कधीही हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत. त्यामुळे मी स्पष्टपणे या घटनेचा निषेध नोंदवते. आमच्या सरकारसाठी विद्यापीठं ही सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित ठिकाणं हवीत. त्याचबरोबर, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी देखील जेएनयूतील हल्ल्याचा आणि हिंसाचाराचा ट्विटच्या माध्यमातून निषेध नोंदवला आहे.

 

Leave a Comment