सत्तास्थापनेबाबत नितीन गडकरींच ‘हे’ विधान खरं ठरलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । आजची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात अचंबित करणारी ठरली. इतके दिवस सत्तास्थापनेच्या चर्चेत भाजप गायब होती तर तिकडे शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात नवं नातं सरकारस्थापनेच्या निमित्ताने तयार होत असताना. अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात भाजपने गनिमी काव्याचा वापर करत सत्तास्थानेच दावा केला, तो ही राष्ट्रवादीची बुलंद तोफ असणाऱ्या अजित पवार यांच्या मदतीने. अशाप्रकारे फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं एक विधान भाजपच्या वर्तमानातील खेळीबद्दल भाकीत ठरल. काही दिवसांपूर्वी राज्यात सत्तानाट्य पूर्ण रंगात सुरु असतांना गडकरी यांनी ‘क्रिकेट आणि राजकारण यांत कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते’ असं प्रसार माध्यमांत प्रतिक्रिया दिली होती. आज भाजपने जेव्हा सत्तास्थापनेचा दावा केला तेव्हा गडकरींनी एका कार्यक्रमात आपल्या विधानाची आठवण करून देत आपल्या त्या विधानाला दुजोरा दिला.

 

Leave a Comment