ऋतुराज पाटील यांची ‘गोकुळ’ वाढणार ताकद !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । जिल्हा दूध उत्पादक संघातील (गोकुळ) माजी आमदार पी. एन. पाटील गटातील पाच संचालकांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. शिवाजी विद्यापीठाजवळ राम मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात पी. एन. यांच्यासह आमदार सतेज पाटील, ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, उदय पाटील हे संचालक उपस्थित होते.

रविवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी पी. एन. यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला. त्यानुसार सोमवारी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील गोकुळच्या संचालकांचा मेळावा झाला. मेळाव्यात कोल्हापूर दक्षिणमधील दूध संस्थांचे अध्यक्ष, संचालक, गोकुळचे कर्मचारी, दूध संस्थांचे कर्मचारी, वितरक उपस्थित होते. मेळाव्यात आघाडी धर्म पाळताना ‘गोकुळ’चे संचालक ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी राहतील, अशी घोषणा संचालकांनी केली.

यावेळी बोलताना ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले,’पी. एन. पाटील यांच्या आदेशानुसार आघाडी धर्म पाळण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. दक्षिणेत काँग्रेसच्या ताब्यातील सर्व दूध संस्था आघाडीच्या पाठीशी राहतील.’ यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘काँग्रेसमधील मतभेद दूर करून आघाडीची सत्ता आणावयाची आहे. त्यानुसार पी. एन. पाटील आणि आपण काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात प्रयत्न करत आहोत. ज्या दूध संस्था अडचणीत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहून सहकारी चळवळ बळकट केली जाईल.

Leave a Comment