सोने चांदीच्या भावात झपाट्याने घट सुरुच, जाणुन घ्या आजचा दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज पुन्हा सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम सुमारे ०.३५ टक्क्यांनी घसरून ४१,२१२ रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीचा दर ०.२७टक्क्यांनी घसरून ४१,२१२ रुपये प्रति किलो झाला आहे.

 आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड चढ-उतार झाले आहेत.
दिल्ली, चेन्नई ते अहमदाबाद येथे आज सोन्याचे भाव जाणून घ्या

गुड रिटर्न्स.इननुसार दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम सुमारे ४३,२६० रुपये आहे. चेन्नईमध्ये आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम सुमारे ४४,८२०रुपये आहे. कोलकाता येथे सोन्याचे दर आज प्रति १० ग्राम पातळीवर ४३,५६० रुपये आहेत. मुंबईत आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४२,१८० रुपये आहे. आज बंगळुरुमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४३,६०० रुपये आहे. हैदराबादमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४४,८२० रुपये आहे. नागपुरात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम ४२,१८० रुपये आहे. विशाखापट्टणममध्ये आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४४,८२० रुपये आहे.

२६ मार्च रोजी सोन्याचा दर काय होता ते जाणून घ्या

गुड रिटर्न्स.इननुसार दिल्लीत २६ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅमच्या आसपास ४३,१६० रुपये होती. चेन्नईमध्ये सोन्याचा दर दहा ग्रॅमच्या आसपास ४४,७२० रुपये होता. कोलकातामध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्राम पातळीवर ४३,४६० रुपये होते. मुंबईत आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४२,०८० रुपये होता. बेंगळुरूमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४३,५०० रुपये होती. हैदराबादमध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४४,५०० रुपये होते.

शुद्ध सोने म्हणजे काय?

बुलियन सोने आणि चांदी अधिकृतपणे किमान ९९.५ टक्के शुद्ध मानले जातात आणि ते इनगॉट्स किंवा बारच्या स्वरूपात असतात.

सराफा बाजार म्हणजे काय?

सोने-चांदी अशा मौल्यवान धातू सराफा बाजारातून खरेदी केल्या जातात. सोने खरेदीचे दोन मार्ग आहेत. लोक सहसा सराफा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. त्याचबरोबर व्यवसायातील लोक वायदा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. हा एक बाजार आहे जिथे वायदे बाजारात (फ्यूचर मार्केट) सोन्या-चांदीचा व्यापार होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

खुशखबर! विजेचे दर पुढच्या ५ वर्षांसाठी कमी होणार

WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन

महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment