मोठी बातमी : अकोलेचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी; उपविजेत्या शैलेशला खांद्यावर घेत केला आनंद साजरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारत मानाची गदा पटकावली. शैलेश शेळके विरुद्ध हर्षवर्धन सदगीर या दोघांमध्ये अंतिम लढत झाली. चुरशीच्या या लढतीत अखेर हर्षवर्धन सदगीरने 2020 च्या महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले. हर्षवर्धनने 3-2 ने शैलेशचा पराभव केला. तो जिंकला काय आणि मी जिंकलो काय, आम्ही एकाच तालमीतील पैलवान अशा भावना हर्षवर्धनने व्यक्त केल्या आहेत. उपविजेत्या शैलेशला खांद्यावर उचलून घेत हर्षवर्धनने खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले. शैलेश आणि हर्षवर्धन हे दोघेही प्रशिक्षक काका पवार यांच्या तालमीतील मल्ल आहेत.

कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देऊन हर्षवर्धनला सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्राचे या लढतीकडे लक्ष्य लागले होते.

Leave a Comment