हर्षवर्धन पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आणि त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील हे देखिल्या भेटीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत होते.

सध्या हर्षवर्धन पाटील यांचा मुख्यमंत्री भेटीचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील देखील भाजपमध्ये जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत विधानसभा गाठली. मात्र लोकसभा निवडणुकीच्यावेळी पवार कुटुंबियांना सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांची मदत घेणे खूप महत्वाचे वाटले. हर्षवर्धन पाटील यांनी देखील त्यांना मदत केली. मात्र आता त्यांच्या मनात भाजप भरले आहे का असे बोलले जाऊ लागले आहे.

दरम्यान हर्षवर्धन पाटील लिखित ‘विधान गाथा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे गेलो होते असे हर्षवर्धन पाटील यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंकिता पाटील यांचे जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्या बद्दल अभिनंदन देखील केले.

Leave a Comment