गोळ्या मारण्याची भाषा करणाऱ्या योगी आणि अनुराग ठाकूर यांना तुम्ही कधी का? प्रश्न केला नाही- इम्तियाज जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । ”देशात कायदा आहे. एक व्यवस्था आहे. वारिस पठाण यांनी आपल्या वक्तव्याबद्दल लेखी स्पष्टीकरण दिले आहे. तरीही काही लोकांना निदर्शने करावी वाटत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. एमआयएम कोणत्याही जातीधर्माच्या विरोधात नाही. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचे आम्ही कधीच समर्थन करू शकत नाही.” असं म्हणत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी वारीस पठाण यांच्या विधानाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते आज औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.

आमचे नेते अकबर ओवेसी एका वक्तव्याबद्दल ४० दिवस जेलमध्ये होते. पण सतत गोळ्या मारण्याची भाषा करणाऱ्या योगी आदित्यनाथ आणि अनुराग ठाकूर यांना कधी कुणी प्रश्नही का केला नाही, असा संतप्त सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. एमआयएमचे वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात शुक्रवारी खासदार इम्तियाज जलील यांना विचारले असता, त्यांनी याबाबत आपलं मत मांडलं.

कार्यकर्त्यांनी एखादे वक्तव्य केले, तर ते थेट पक्षाशी जोडले जाते; त्यामुळे कार्यकर्त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये यासाठी पक्षाध्यक्षांशी चर्चा करून मार्गदर्शक सूचना काढली जाईल, असं इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांचीही आपण भेट घेणार असल्याची माहिती जलील यांनी यावेळी दिली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment