राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार का ?? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी वर्तवली ‘ही’ शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात राज्यातील करोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा किं चित वाढ दिसून येत आहे. त्यामुळे ही दुसऱ्या लाटेची सुरुवात आहे का याकडे तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे. मात्र राज्यामध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी झालेली आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

युरोपीयन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे त्या देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे देश आणि राज्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाती आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी असून आली तरी राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर याआधी लग्नसमारंभात पन्नास लोकांना परवानगी दिली होती त्यांच्या संख्येत वाढ करण्याचा विचार सरकार करत असल्याचंही टोपे यांनी म्हंटलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या कालावधीत राज्यात एका दिवशी सर्वोच्च सुमारे २३ हजार रुग्ण सापडले. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात ही संख्या ३६४५ पर्यंत खाली आली होती. मात्र, त्यात पुन्हा वाढ होऊन ऑक्टोबरच्या शेवटी दररोजच्या रुग्णांची संख्या सहा हजारांपर्यंत गेली आहे.

राज्यात २६ ऑक्टोबरला एकाच दिवशी राज्यात ३६४५ रुग्ण आढळले होते. २७ ऑक्टोबरला ५३६३, २८ ऑक्टोबरला ६७८३ तर २९ ऑक्टोबरला ५९०२ रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment