हिंगोलीतील राष्ट्रवादीचा नेता भाजपात; निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली प्रतिनिधी । हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराव वडकुते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. वडकुते यांनी राष्ट्रवादी सदस्यत्वाचा व विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. रामराव वडकुते हे शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष होते.

वडकुते हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. मराठवाड्यात राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार करण्यात वडकुते यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. पक्षातील सातत्यपूर्ण कामगिरी, संघटन या गुणांना पारखून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेवर पाठवले होते. विधानसभा निवडणुकीला आठवडा शिल्लक असताना वडकुते यांनी असा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली आहे.

Leave a Comment