तर मग HIV ची चाचणी करायलाच हवी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आरोग्यमंत्रा | स्वप्निल हिंगे

एखाद्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याअगोदर आपण एचआयव्ही बाधीत आहोत काय याची चाचणी करुण घेणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. लैंगिकसंबंध झाल्यानंतर जर तुम्हाला शंका असेल तर एचआयव्ही टेस्ट करून घ्यायलाच हवी. टेस्ट पॉझिटीव्ह आली म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला एड्‌स होणारच आहे असा होत नाही. एचआयव्ही पॉझिटीव्ह  असणे म्हणजे आज ना उद्या एचआयव्ही बाधित होण्याची संभाव्यता असणे होय. मात्र एचआयव्ही ची चाचणी केव्हा आणि कशी करावी याबाबत बर्याचजणांमधे संभ्रम असतो. तेव्हा आजच्या जागतिक एड्स दिनानिमित्त आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एचआयव्ही चाचणी बद्दल तुम्हाला गरजेची असलेली माहिती. जरुर वाचा आणि शेअर करा.

१) एचआयव्ही व्हायरस शरीरात शिरला आहे की नाही याची शंका काढून टाकण्यासाठी एचआयव्ही टेस्ट करायला हवी.

२) कुणाशीही लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी तुम्हाला एचआयव्ही आहे की नाही हे तुम्ही सांगू शकत नाही. लैंगिकसंबंध झाल्यानंतर तुम्हाला शंकाच येत असेल तर एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी.

३) एचआयव्ही टेस्ट ही ऐच्छीक आहे. ती करुन घेण्यासाठी तसे लिहून द्यावे लागते. व्यक्‍तीचे नाव गुप्त ठेवले जाते. फॅमिली डॉक्‍टर किंवा अरोग्यसेवक तुम्हाला टेस्ट कुठे करतात याची माहिती देतात. व्हायरस शरीरात शिरला आहे की नाही याची शंका काढून टाकण्यासाठी एचआयव्ही टेस्ट करायला हवी.

४) एचआयव्हीची अचूक तपासणी – यासाठी एलायझा टेस्ट करतात. याच्या दोन वेगवेगळया किटस असतात. आणि तपासणीमध्ये एचआयव्हीचे अगदी अचूक निदान करता येते. त्याशिवायही आणखी काही टेस्टस आहेत. पूर्वी वेस्टर्न ब्लॉट टेस्ट करायचे. पण या टेस्टला खूप खर्च येतो. पण ही अगदी अचूक टेस्ट आहे. एलायझा टेस्ट जर दोन-तीन वेळा करूनही अचूक सांगता येत नसेल तर वेस्टर्न ब्लॉट टेस्ट करतात ही मात्र अचूक असते.

सर्वात नवीन टेस्ट कोणती?

पी-24 अँटीजीन आणि पीसीआर (पॉलीमरेज चेन रिऍक्‍शन) या दोन टेस्ट नवीन आहेत. पी-24 टेस्ट संशोधन स्वरुपाची आहे. आणि ब्लड बॅंका ती करतात. एलायझा टेस्ट करण्यापूर्वी काही आठवडे या टेस्टमुळे पॉझिटीव्ह समजते. पीसीआर म्हणजे पॉलीमर चेन रिऍक्‍शन टेस्ट म्हणजे जनुकांचं रेखांकन केल्यासारखं असतं. पीसीआरमुळे व्हायरस ओळखता येतो. ही टेस्ट नेहमीच अचूक असते. आता तर व्हायरसची संख्यासुध्दा मोजता येते. व्हायरस किती प्रमाणात वाढत आहेत हेही सांगता येते. पण हे अद्याप संशोधन पातळीवरच आहे. तरीसुध्दा औषधोपचार चालू असताना व्हायरसची संख्या कमी झाली की नाही हे बघण्यासाठी ही टेस्ट करतात.

Leave a Comment