मी आजही मराठी आणि हिंदूच मात्र, प्रत्येकाने आपला धर्म घरातच पाळावा – राज ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । पक्षांच्या अधिवेशनांची परंपरा कमी होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अधिवेशन घ्यायची गरज वाटत होती असं म्हणत राज ठाकरेंनी २३ तारखेला घेतलेल्या अधिवेशनाविषयी स्पष्टता दिली. सोशल मीडिया वापरताना कोणतीही वाईट गोष्ट पदाधिकाऱ्यांनी पोस्ट करायची नाही अशी स्पष्ट तंबी राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना दिली. तुमच्या भावना महत्वाच्या असल्या तरी पद नावाच्या गोष्टीचा विचार व्हायलाच हवा असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

यशाला बाप खूप असतात पण पराभव झाला की सल्लागार खूप मिळतात असं सांगत राज ठाकरे यांनी पुढील वाटचाल ही शिस्तबद्ध पद्धतीनेच होणार याकडे लक्ष वेधलं. बारामतीकर पाठक आणि वसंत फडके यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी दिली असून तेच सगळी जबाबदारी सांभाळतील असं ठाकरे यावेळी म्हणाले. शॅडो कॅबिनेटविषयी बोलताना समाजावर परिणाम करणारी विद्यमान सरकारची खाती नीट काम करतात की नाही याकडे लक्ष दिलं जाईल अशी स्पष्टोक्ती राज ठाकरे यांनी दिली.

याच सभेत राज ठाकरे यांनी बदललेल्या झेंड्याविषयीची आपली भावनाही बोलून दाखवली. ही कल्पना २००६ सालीच मनात असल्याचं सांगत, लोकआग्रहास्तव सोशल इंजिनीअरिंगचा नाद म्हणून रेल्वे इंजिन आणि इतर रंगांचा झेंडा निवडल्याची कबुली राज ठाकरेंनी दिली. शिवरायांचं सोशल इंजिनिअरिंग त्यावेळीपासूनच डोक्यात होतं आणि म्हणूनच अधिवेशन घेतानाच हा झेंडा लोकांसमोर ठेवल्याचं राज म्हणाले. महाराजांची राजमुद्रा ही आपली प्रेरणा असून राजमुद्रा असलेला झेंडा निवडणुकीसाठी वापरणार नसल्याचं सांगत आपण आजही मराठी आणि हिंदूच असल्याची गर्जना राज यांनी केली. माझ्या मनात कसलाही वैचारिक गोंधळ नसून देशातील सर्व मुस्लिम आपलेच असल्याचं राज ठाकरे म्हणाले. ए.पी.जे अब्दुल कलाम, जावेद अख्तर आणि जहीर खान यांचा दाखल देत राज यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीवर आपली भूमिका काय असेल याकडे लोकांचं लक्ष वेधलं. पाकिस्तान आणि बांगलादेशमधील मुस्लिमांवर यावेळी राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं. घुसखोरांना रोखायचं असेल तर समझोता एक्सप्रेसला ब्रेक लावायचा सल्लाही यावेळी ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

Leave a Comment