मला इंग्रजी येत नाही, मी इंग्रजीत बोललो तर जोक होतो – रावसाहेब दानवे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : भाजप नेते आपल्या गावराण भाषेतील शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. दानवे भाषण करत असताना अस्सल मराठवाडी भाषा त्यांच्या तोंडून निघते. त्यांच्या या भाषेतून अनेक विनोदांचा जन्म होत असतो. नाशिकमधील कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी असेच हटके विधान केले आहे. त्यांनी म्हंटले की, मला इंग्रजी येत नाही. मी इंग्रजीत बोललो तर जोक होतो. नाशिकच्या गोकुळ फाऊंडेशनच्या एल. डी. पाटील अकॅडमीतील इंग्रजी मीडियम इमारतीच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

मला इंग्रजी येत नाही. मी तोडकीमोडकी इंग्रजी बोलतो. माझे शिक्षण मराठीतून झाले आहे. आमच्याकडे इंग्रजी शाळा नव्हत्या. मी इंग्रजी बोललो तर जोक होतो,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, लवकरच भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होईल. तर उद्या(20 जानेवारीला भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार आहे अशी माहिती दानवे यांनी दिली.

 

Leave a Comment