video: ‘राफेल’ भारतीय हवाई हद्दीत दाखल, ‘हॅप्पी लँडिंग’ च्या संरक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमानांच्या आगमनाला आता फक्त काही मिनिटे उरली आहेत. राफेल भारताच्या हवाई हद्दीत दाखल झाले आहे. हरयाणामधील अंबाला बेसवर ही विमाने उतरतील. नौदलाने राफेलच्या वैमानिकांना ‘हॅप्पी लँडिंगच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौके बरोबर संपर्क साधला.

पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग करणार आहेत. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत 3 सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत.

अंबाला एअरबेसजवळ १४४ कलम लागू
हरियाणामधील अंबाला हवाई तळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अंबाला जिल्हा प्रशासनाने हवाई तळाजवळ १४४ कलम लागू केलं आहे. यासोबतच फोटो काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. फ्रान्समधून उड्डाण करण्यात आलेली राफेल लढाऊ विमानं बुधवारी भारतात दाखल होणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment