‘भाजप सरकारकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न’; खासदार जलील यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. अनेक नागरिक रस्त्यांवर उतरून निदर्शने करत आहेत. तसेच दिल्लीसह ईशान्येकडूही राज्यांमध्ये मोठा हिंसाचार होत आहे. हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचा आरोप करत कायदा मागे घेण्याची मागणी होत आहे. परंतु सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या मुद्यावरूनच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जलील म्हणले की, भाजप सरकारकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात असून याची सुरवात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने झाली आहे. हि बाब लोकशाही साठी योग्य नाही. औरंबाद शहरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात २० तारखेला मोर्चा काढ्यात येणार आहे. त्याच्या आढावा बैठकीत जलील बोलत होते. संविधानावर विश्वास ठेवणारे आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन जलील यांनी केले आहे.

दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात जनभोक्ष उसळला असून, त्यावर विरोधकही आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते, बसपा प्रमुख मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी या कायद्याला विरोध केला आहे. तर वेळ पडल्यास रस्तावर उतरण्याचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

 

Leave a Comment