करोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार तेव्हा तयार राहा! शरद पवारांचे भाकित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे देशासमोर मोठं आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळं पुढचे काही महीने आपल्याला भरपूर काटकसर करावी लागणार आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे आज संवाद साधला. करोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळं वायफळ खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. नगर पालिकांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसणार आहे,’ असं भाकित शरद पवार यांनी केलं.

राज्याला पुरेल इतका अन्नधान्य साठा उपलब्ध आहे, त्यामुळे काळजी करु नका. जिथे आहात तिथे राहा, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. शरद पवार पुढे म्हणाले की, ऊसतोड कामगारांची व्यवस्था कारखानदारांनी करावी. खेदजनक बाब म्हणजे अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे बाहेर फिरू नका. पोलिसांवर कारवाईची वेळ येऊ देऊ नका. त्याचबरोबर अशा काळात काळाबाजार होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे.आजच्या स्थितीतही राज्य सरकार सामंजस्यपणानं काम करत आहे. सरकारला भूमिका घ्यायला भाग पाडू नका. जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्याची गरज नाही. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपापल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी माहिती देत आहेत. त्यावर विश्वास ठेवा, सूचनांचं पालन करा,’ असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

‘करोनावर आपण विजय मिळवणारच आहोत. पण, त्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनाचं पालन करा. करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. लॉकडाउनच्या काळात मी सुद्धा घराबाहेर पडलेलो नाही आहे. या काळात घरातच थांबा, बाहेर पडू नका. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठं आहे. जर सूचनाचं पालन केलं नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा पवार यांनी जनतेला दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment