काळ्या पैशाविरोधात सरकारला मोठं यश ; स्विस बँकेकडून भारतीय खात्यांचा तपशील सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काळ्या पैशाविरूद्धच्या लढाईत सरकारला आणखी एक मोठं यश मिळाले आहे. भारताला स्विस बँकेतील भारतीय नागरिकांच्या खात्यांच्या तपशिलाचा दुसरा संच मिळाला आहे. त्यामुळे या बँकेत कथितरीत्या दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या मोहिमेला वेग येणार आहे.

स्वित्झर्लंडकडून देण्यात आलेल्या यादीत मोठ्या प्रमाणात भारतीय संस्था आणि नागरिकांची नावं आहे. गेल्या एका वर्षात स्वित्झर्लंडमधील अधिकाऱ्यांनी १०० पेक्षा अधिक भारतीय नागरिक आणि संस्थांविषयी माहिती दिली असल्यांचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. ही प्रकरणे बहुतेक जुन्या खात्यांशी संबंधित आहेत, जी २०१८ पूर्वी बंद झालेली असू शकतात, ज्यासाठी स्वित्झर्लंडने परस्पर प्रशासकीय पाठबळाच्या पूर्वीच्या आराखडय़ात भारताला माहिती दिली आहे. दरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांनी त्या खातेधारकांविरोधात कर चुकवेगिरीचे पुरावे उपलब्ध करून दिले होते. एईओआय केवळ २०१८ दरम्यान सक्रिय किंवा बंद असलेल्या खात्यांना लागू होते.

यापैकी काही प्रकरणे भारतीयांनी पनामा, ब्रिटीश व्हर्जिन आयलँड्स आणि केमन बेटांसारख्या विविध भारतीयांनी स्थापन केलेल्या संस्थेशी संबंधित आहेत, तर या व्यक्तींमध्ये बहुतांश उद्योजक आणि काही राजकारणी आणि तत्कालिन राजघराणी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. तथापि, भारतीयांकडे असलेल्या खात्यांची नेमकी संख्या किंवा मालमत्ता याबद्दल तपशील सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला

स्विस बँकेने खातेधारकाचे नाव, खात्यातील आर्थिक व्यवहार, धनको-ऋणको, पत्ता, निवासाचा देश, कर परिचय क्रमांक, खात्यावरील जमा रक्‍कम आणि भांडवली उत्पन्‍न हा तपशील दिला आहे. या माहितीमुळे करदात्यांनी आपले खरे उत्पन्न जाहीर करून कर भरला आहे काय, हे कर वसुली यंत्रणेला कळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com