रेल्वेकडून प्रवासी तिकिटांचं बुकिंग ३० जूनपर्यंत रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच व्यवहार बंद आहेत. रेल्वे सेवाही बंद आहे. दरम्यान, अडकलेल्या मजूर, कामगारांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मालवाहतूकही सुरु आहे. मात्र, रेल्वेने प्रवासी वाहतूक अद्याप सुरु केलेली नाही. दरम्यान, पुन्हा एकदा रेल्वेने आरक्षित तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेकडून प्रवासी तिकिटांचं बुकिंग ३० जून पर्यंत रद्द करण्यात आलं आहे. या दरम्यान रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे आणि श्रमिक विशेष रेल्वे मात्र सुरू राहतील. यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत आणखीन किती वाढ होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेच्या विशेष रेल्वे सेवांच्या अंतर्गत येताच नवीन बुकिंग सुरू होईल. रद्द झालेल्या सर्व तिकिटांना पूर्ण परतावा उपलब्ध असेल. जर आपण जूनमधील  नियोजित प्रवासासाठी तिकिट बुक केले असेल तर ते तिकीट रद्द होईल. परंतु जर आपण येत्या काही दिवसांत आपल्या मूळ राज्यात परत जाण्याचा विचार करीत असाल आणि  तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते शक्य नाही. कारण बुकिंग अद्याप सुरु करण्यात आलेले नाही.

३० जून पर्यंत लॉकडाउन ४.० चालू असेल ,असे संकेत मिळत आहे. दरम्यान, अद्याप तरी याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, ३० जूनपर्यंतची तिकिटे रद्द करण्याच्या निर्णयामुळे रेल्वे सेवा रुळावर येण्याची चिन्हे नसल्याचे संकेत आहेत. सध्या फक्त विशेष गाड्या आणि श्रमिक स्पेशल चालतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment