चार लाख लोकांची तहान २१५ टँकर कशी भागवणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जून महिन्याचा पंधरावडा संपला तरी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची टंचाई कमी झालेली नाही. सध्या टंचाई वाढतच असून सध्या १८३ गावे आणि एक हजार ३७४ वाड्यावस्त्यांमधील चार लाख १८ हजार २५५ लोकांना तब्बल २१५ टँकरने पाणीपरवठा केला जात आहे. गेल्या पावसाळयात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये सध्या चारा आणि पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे, उन्हाची तीव्रता वाढतच चालल्याने दिवसेंदिवस या तालुक्यातील गावात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत.

जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी पावसाने सुरुवात केली नाही . सर्वाधिक जत तालुक्यातील ९६ गावं आणि ७१६ वाड्या, आटपाडी १४ गावे आणि २२४ वाड़या, कवठेमहांकाळ ३० आणि १४१ वाड्या, खानापूर २६ गावे आणि १९७ वाडया, तासगाव १८ गावं आणि १५ वाडया, मिरज ८ गावं आणि ३ वाडया अशा १८३ गावेे आणि एक हजार ३७४ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चार लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. जुन महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी मान्सून पावसाने सुरूवात केली नसल्याने टँकरची संख्या कमी होताना दिसत नाही.

जलयुक्त शिवार योजना, पानी फौंडेशनच काम होऊनसुद्धा राज्यातला दुष्काळ संपत नाही. कारण या सगळ्या उपाययोजना, पाऊस पडल्यानंतर जमिनीखालची पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आहेत. पण पाऊसच पडत नसेल तर दुष्काळग्रस्तांची तहान भागणार तरी कशी हा इथला सर्वात मोठा प्रश्न आहे. यासाठीच शाश्वत उत्तर आपल्याला शोधावं लागेल.

Leave a Comment