IPL 2020 च्या मुख्य स्पॉन्सरशिपची माळ Dream 11 च्या गळ्यात; 222 कोटी रुपये मोजणार

मुंबई । IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. Dream 11 यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे. Tata Sons, Byju’s, Unacademy हे ब्रँडही या शर्यतीत होते. पण अखेर Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये Dream 11 IPL 2020 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा रंगणार आहे असे वृत्त एएनआयने IPL आयुक्त ब्रिजेश पटेल यांच्या हवाल्याने दिले आहे.

IPL आणि चिनी कंपनी विवो (VIVO) हे पाच वर्षांसाठी करारबद्द झाले होते. परंतु भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेत २० भारतीय जवानांना वीर मरण आले होते. यानंतर चीन-भारत यांच्या तणाव निर्माण झाला. भारताने कठोर पावले उचलत चीनच्या अॅप्स कंपन्यांना जोरदार दणका दिला. तब्बल ५९ अॅप्सवर बंदी घातली. टिकटॉक हे आघाडीच्या अॅपचा यात समावेश आहे. त्यानंतर चीनविरोधात आणखी वातावरण तयार झाल्याने ‘बीसीसीआय’ने VIVO सोबतचा करार एका वर्षासाठी स्थगित केला.

१३ व्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप निविदा मागवताना ‘बीसीसीआय’ने काही महत्वाच्या अटी घातल्या होत्या. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असलेल्या कंपनीनेच निविदा पाठवावी ही त्यातली महत्वाची अट होती. स्पॉन्सरशिपचे हक्क देताना सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपनीला हक्क मिळणार नाहीत हे ‘बीसीसीआय’ने याआधीच स्पष्ट केले होते. हक्क मिळणाऱ्या कंपनीचा IPL या ब्रँडला कसा फायदा होईल आणि इतर बाबींचा विचार करुन नवीन स्पॉन्सरबद्दल निर्णय घेतला जाईल, असे भारतीय क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com