राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील, अजित पवारांचे सर्वाधिकार राष्ट्रवादीने काढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी ।  पक्षांतर्गत बंडाळी करून पक्षाला फुकटचा शहाणपणा करणाऱ्या अजित पवार यांना राष्ट्रवादीने घरचा रस्ता दाखवला आहे. राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांना असलेले सर्व अधिकार काढुन घेण्यासोबत त्यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ कमिटीने केली आहे. शनिवारी सायंकाळी याबाबतचा अधिकृत निर्णय घेण्यात आला.

या आदेशामुळे अजित पवार आता आमदारांना कोणताही आदेश देऊ शकणार नाहीत किंवा व्हीपही बजावू शकणार नाहीत. अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आता विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवारांच्या गोटात संध्याकाळी केवळ ४ आमदार राहिले असल्याचं चित्र समोर आलं आहे. आता जयंत पाटील पुढची सूत्रे कशी हलवतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Comment