कागलमध्ये राजकीय वातावरण तापलं; नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांच्या ‘फिल्डिंग’ला वेग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । राज्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या ‘कागल’चे राजकिय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हसन मुश्रीफ गट, संजय घाटगे गट, मंडलिक गट, समरजित घाटगे गट यांच्यामध्ये चांगलेच राजकारण व रस्सीखेच दिसत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा विधानसभेसाठी अर्ज भरला आहे. मुश्रीफांना दुसरी हट्रिक करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरदार या विधानसभा मतदार संघात ऐकायला मिळत आहे.

दोन्ही घाटगे उभारल्यामुळे मुश्रीफांना याचा फायदा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कागल विधानसभेचा अंदाज घेणे सध्या तरी कठीण आहे. पण अनेकांनी जरी अर्ज भरले असले तरी लढत मात्र तिरंगी व अटीतटीची होणार आहे. खासदार संजय मंडलिकांचीही भूमिका या विधानसभेसाठी निर्णायक ठरणार आहे. यामुळे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष तिकडेच लागून आहे. सध्या गावोगावी नेत्यांच्या पदयात्रा, घर टू घर प्रचार, दुचाकी रॅली, कार्यकर्त्यांची फिल्डिंग जोरदार दिसत आहे. कागल मध्ये फोडा फोडीचे राजकारण कायमच पहायला मिळत असते. सर्वच उमेदवारांच्या घरातील सर्वच सदस्य प्रचारासाठी गावोगावी भेटीगाठी घेत हळदी कुंकू कार्यक्रम घेत आहेत. कागल विधानसभा मतदारसंघात उतूर, गडहिंग्लज या शहर व भागाचाही समावेश आहे.

कागल बरोबर या भागाच्या मतदानाचा विचारही विजयासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रवादी काँगेस व मित्रपक्ष पक्षासोबत विद्यमान आमदार मुश्रीफ यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. गेली वीस वर्षे आमदार व मंत्री म्हणून मुश्रीफ कार्यरत आहेत. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार संजय घाटगे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सध्या निवडणुका प्रचारासाठी भव्य सभा घेण्यास सुरवात झाली आहे. यासाठी मोठे कलाकार, मोठे नेते यांच्या सभा या विधानसभा मतदार संघात होत आहेत. दरम्यान एकंदरित कागल तालुक्यात अटीतटीची निवडणुक होणार असल्याची चर्चा होत आहेत. विकासकामे, विश्वासार्हता, शाश्वत विकास अशा अनेक मुद्यांवर ही निवडणूक होत आहेत. कोण निवडून येणार? दोन नंबर ला कोण राहणार ? तीन नंबरवर कोण असणार? याची चर्चा सध्या गावोगावी आणि शहरांमध्ये रंगत आहे.

Leave a Comment