कराड नगराध्यक्षाच्या दालनाला ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी ठोकलं टाळ; वेळ न दिल्यानं घेतला आक्रमक पवित्रा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कराडच्या नगराध्यक्षा रोहिनी शिंदे यांच्या येथील पालिकेतील केबिनला टाळे ठोकल्याची घटना आज घडली आहे. नगराध्यक्षा जनतेच्या कामांना महत्व देत नाहीत असा ठपका ठेवत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील नगराध्यक्षा शिंदे यांच्या पालिका केबिनला चक्क टाळे ठोकून त्यांना लोकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावे असा संतप्त पवित्रा घेतला.

सकाळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते नगराध्यक्षाना निवेदन देण्यासाठी पालिकेत आले होते. त्यावेळी अध्यक्ष पालिकेत नाहीत, तर भाजप पक्षाच्या कार्यक्रमात गेल्या असल्याचं सांगण्यात आलं.त्यांच्या कडून लवकर येण्याबाबत टाळाटाळ होत गेल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या पालिकेतील कार्यालयास चक्क टाळे ठोकले. प्रहार संघटनेच्या वतीने, शहरातील विविध भागांतील तसेच वाखान परिसरातील महत्वाच्या समस्यां सोडवण्यात याव्यात या साठी नगराध्यक्षा शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांना त्याबाबतचे निवेदन देण्याच्या करिता म्हणून हे सर्व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येथील पालिकेत सकाळी ११ वाजणेचे सुमारास आले होते.

मात्र,भाजपा च्या वतीने आज येथील तहसील कार्यालयासमोर सध्याच्या राज्यसरकरच्या विरोधात शेतकऱ्यांवर सुरू असणाऱ्या फसवणुकीविरोधात व महिलांच्या अत्याचारात वाढ होत असल्याच्या कारणाने धरणे आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी म्हणून नगराध्यक्षा सकाळ पासून भाजप च्या सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होत्या, त्यामुळे त्या पालिकेत आल्या नसल्याचं सांगण्यात आलं.त्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ११ ते १ वाजे पर्यंत वाट पाहून चक्क नगराध्यक्षांच्या येथील पालिकेतील केबिनलाच टाळे ठोकून नगराध्यक्षाना जर शहरातील समस्यांची सोडवणूक करण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन पक्षाचे काम करावे व घरी बसावे असा इशाराही संघटनेच्या वतीने या वेळी देण्यात आला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment