कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा: आमदार चंद्रकांत जाधव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर शहराचा थेट पाईपलाईन प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आज मुंबई येथील बैठकीत केली. कोल्हापूर शहराचा जिव्हाळ्याचा असणारा थेट पाईपलाईनचा प्रश्न अनेक वर्ष रखडलेला आहे. यासंदर्भात आमदार चंद्रकांत जाधव यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मंत्रालयात भेट घेवून थेट पाईपलाइनच्या रखडलेल्या कामाची माहिती दिली.

थेट पाईपलाइनमधील पाईप टाकण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. फक्त ५ ते ६ किमीचे काम रखडलेले आहे, ते पूर्ण करण्यात यावे. तसेच काळम्मावाडीचे धरणातील थेट पाईपलाईनच्या जॅकवेलच्या बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. हे काम धरणातील असलेल्या पाण्याच्या साठयामुळे थांबले आहे. धरणातील पाणीसाठा जॅकवेलच्या बांधकामासाठी पाण्याचा विसर्ग करावा व तसे आदेश जलसंपदा विभागाला द्यावेत, अशी मागणी या बैठकीत आमदार जाधव यांनी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.

तसेच काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या हेडवर्क्स व शीर्ष कामाकरीता मौजे राजापूर, ता. राधांनगरी येथील सर्व्हे नं. ५१ मधील १.३५ हेक्टर आर क्षेत्र कोल्हापूर महानगरपालिकेस हेक्टर इतकी जमीन कोल्हापूर महानगरपालिकेस मिळावी, अशी मागणी यावेळी आमदार जाधव यांनी केली. यावर मंत्री जयंत पाटील यांनी अधिवेशनकाळात येणार्‍या नियामक मंडळाच्या बैठकीत काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या हेडवर्क्स व शीर्ष कामाकरीता जागेच्या यविषयासंदर्भात दखल घेवून सदर जागा हस्तांतरित करण्याकरिता तात्काळ पूर्तता करण्याची ग्वाही दिली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा. 

Leave a Comment