IPS आणि IAS प्रियकर-प्रेयसीने ऑफिसमध्येच बांधल्या सात जन्माच्या गाठी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या IPS आणि IAS प्रियकर-प्रेयसीने ऑफिसमध्ये सात जन्माच्या गाठी बांधल्या आहेत. व्हॅलेंटाइन्स डे च्याच दिवशी यांनी आपल्या ऑफीसमध्ये रजिस्टर पद्धतीने विवाह केला. अत्यंत व्यस्त वेळापत्रकामुळे विवाहासाठी वेगळा वेळ काढणे शक्य नसल्याने IAS अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातच IPS प्रेयसी सोबत विवाह केला.

तृषार सिंगला असे या आयएएस अधिकाऱ्याने नाव आहे. ते २०१५ बॅचचे पश्चिम बंगाल केडरचे अधिकारी आहेत. तृषार सिंगला उलुबेरियामध्ये एसडीओ पदावर कार्यरत आहेत. नवजोत सिम्मी या २०१७ बॅचच्या बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची सध्या पाटण्यामध्ये पोस्टिंग आहे. त्या डीएसपी म्हणून सेवा बजावत आहेत. या लग्नासाठी नवजोत सिम्मी खास पाटण्याहून बंगालला आल्या होत्या.

नवजोत आणि तृषार दोघेही पंजाबचे असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. प्रेमाचे हे त्यांचे नाते विवाहामध्ये बदलले आहे. लग्नासाठी तृषार यांना पंजाबला जाणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी कार्यालयातच विवाहाचा निर्णय घेतला अशी माहिती सिंगला यांच्या एसडीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. बंगालमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर विवाहानिमित्त खास स्वागत समारंभ आयोजित करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. एकत्र राहता यावे, यासाठी दोघे केडर बदलण्याचा विचार करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com