दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी सरकारचीच- भैय्याजी जोशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या भीषण हिंसाचारावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश भैय्याजी जोशी यांनी महत्वाचं विधान केलं आहे. दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने दिल्लीची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे असं भैय्याजी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रातील भाजप सरकारची मार्गदर्शक संस्था असल्यानं जोशी यांचे विधान सूचक मानलं जात आहे.

ईशान्य दिल्लीत सलग तीन दिवस झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी २ जणांनी आपला जीव गमावला असून २ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात ३० आणि एलएनजीपी रुग्णालयात ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक जखमी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी बऱ्याच जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, झालेल्या हिंसाचारासाठी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तब्बल १८ एफआयआर नोंदविण्यात आले असून १३० दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे. काल बुधवारी कोणतीही मोठी हिंसाचाराची घटना घडली नाही. मात्र, रात्रीच्या वेळी मौजपूरसह काही भागात तुरळक हिंसाचाराच्या बातम्या समोर आल्या आहेत. दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान संवेदनशील भागात सातत्याने गस्त घालत आहे. ईशान्य दिल्लीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, वातावरणात अजूनही तणाव आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment