भारतातील लाॅकडाउन ३ मे पर्यंत – पंतप्रधान मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | देशात लागू असलेला ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली.

अनेक राज्यांनी लाॅकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल डिस्टंसिंग आणि लाॅकडाउनचा देशाला चांगला फायदा झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण खूप चांगल्या पद्धतीने कोरोनाशी लढा दिला आहे.

PM Modi's address to the nation on COVID-19 | Apr 14, 2020

Leave a Comment