दोस्तीत कुस्ती ; पुण्याच्या या मतदारसंघात लढणार तीन सख्खे मित्र एकमेकांच्या विरोधात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल शुक्रवारी संपली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे बरेचसे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे. पुणे शहरात एकाच मतदारसंघात सख्खे तीन मित्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे .त्यामुळे पुणे तिथे काय उणे या म्हणीचा साक्षात्कार विधानसभा निवडणुकीने देखील करून दिला आहे.

पुणे कॅटलमेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघ हा अनुसुचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव असणारा मतदारसंघ या मतदारसंघातून भाजपचे दिलीप कांबळे सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यांनी गतवेळी माजी मंत्री रमेश बागवे या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. यावेळी दिलीप कांबळे या ठिकाणी लढत देत नसून त्यांचे बंधू सुनील कांबळे हे या मतदारसंघात भाजपची उमेदवारी करत आहेत. मात्र हा मतदारसंघ वेगळ्याच बाबीने चर्चेत आला आहे. मित्रानेच मित्राच्या पाठीत खंजीर खुपसत मित्राच्या विरोधात बंडाचे निशाण उभारल्याचे या मतदारसंघात बघायला मिळत आहे. काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या विरोधात वंचित आघाडीकडून लक्ष्मण आर्डे हे उमेदवारी करत असून ते माजी नगरसेवक आहेत. रमेश बागवे यांनीच त्यांना राजकारणात आणले आणि नगरसेवक केले. ते रमेश बागवे यांचे मित्र आहेत. तर काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने सदानंद शेट्टी हे काँग्रेसचे नगरसेवक रमेश बागवे यांच्या विरोधात उमेदवारी करत आहेत. ते देखील रमेश बागवे यांचे मित्र असून त्यांना देखील रमेश बागवे यांनीच राजकारणात आणले आहे.

सदानंद शेट्टी हे मूळचे कर्नाटकचे मात्र त्याचा जन्म पुण्याचा म्हणून ते पुणेकरच. बागवे मंत्री असताना झोपडपट्टी पुनर्वसनाचे कंचराट सदानंद शेट्टी यांना देण्यात आली. त्याच प्रमाणे त्यांना इतर कामे देखील बागवे यांनी देऊन आर्थिक पाठबळ दिले. हीच सच्ची मैत्री त्यांच्यावर उलटल्याने चित्र सध्या संपूर्ण पुणे शहर बघत आहे. भाजपची या मतदारसंघात कामे चांगली आहेत. त्याच प्रमाणे भाजपचाच उमेदवार या मतदारसंघात निवडणून येईल यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि नगरसेवक प्रयत्न करत आहेत. तर काँग्रेसचे बागवे देखील मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. परंतु त्यांना त्यांच्या दोन मित्रांच्या बंडाळीचा पायगुत्ता आडवा येत आहे.

Leave a Comment