युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर होणार शिक्का मोर्तब

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप यांची युती १९८९ सालापासून आज तागायत आहे. २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद सोडला तर शिवसेना विधानसभेच्या मागील ५ निवडणुकासोबत लढली आहे. तर सेना भाजपची युती ३० वर्षांपासून अखंडित आहे. मात्र युतीच्या आजवरच्या इतिहासात शिवसेना कधीच भाजपपेक्षा कमी जागा घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली नाही. परंतु आगामी निवडणुकीला भाजपचा दिग्विजय पाहून शिवसेना नरमली आहे. तसेच कमी जागांवर लढण्यास देखील तयार झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जीवावरच शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. भाजपचा जसा लाभ लोकसभा निवडणुकीला झाला. तसाच लाभ विधानसभा निवडणुकीला करून घेण्याचा संकल्पच शिवसेना नेतृत्वाने सोडला आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्व इतिहासात पहिल्यांदा कमी जागा घेऊन लढण्यास देखील तयार झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भाजप १५४ ते १५९ पर्यंत जागा लढू शकते तर शिवसेना आणि भाजप प्रत्येकी ९ जागा मित्र पक्षांना सोडू शकतात. याचच अर्थ शिवसेना केवळ ११६ ते १२० जागांवर लढू शकते. तर भाजपचे मित्र पक्ष १८ जागी निवडणूक लढू शकतात.

शिवसेना नेतृत्व कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप सोबत असणारी युती तोडू इच्छित नाही. कारण शिवसेनेला माहित आहे. भाजप युतीत लढले तर स्वबळावर सरकार बनवू शकणार नाही. म्हणून आपण अडीज वर्ष मुख्यमंत्री पदावर दावा करूनच सरकारमध्ये सामील व्हायचे. यामुळे शिवसेनेच्या या चालीला सत्यात उतरू नदेण्यसाठी भाजप देखील मोठे प्रयत्न करत असून भाजपने मतदारसंघ निहाय अहवाल मागवून कमीत कमी जागा हातातून कशा जातील यावर मंथन सुरु केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हि सेना भाजपमधीलमुष्टियुद्ध असणार असे म्हणायला काहीच हरकत नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com