५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकार विरोधात आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्र सरकारचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या वतीने शेतकरी, कामगार आणि मजुरांसाठी ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी करत राज्य भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने केली. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. आत्मनिर्भर भारत या दूरदृष्टीतून भारताला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, १२ बलुतेदार आणि असंघटित कामगार यांच्यासाठी वेगळे ५०,००० करोड रुपयांचे पॅकेज द्यावे या मागणीसाठी निदर्शने काढली आहेत.

फडणवीस आणि इतर पक्षनेत्यांनी मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत. हातामध्ये शेतकरी, १२ बलुतेदार आणि असंघटित कामगार वर्गासाठी ५०,००० करोड रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात यावे अशा मागणीचे फलक घेऊन ते भाजपा कार्यालयाबाहेर उभे आहेत. महाराष्ट्राला आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी ही मागणी त्यांनी इतर पक्षनेत्यांसोबत केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment