महाविकास बजेट २०२०: यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण-क्रीडा क्षेत्राला काय मिळालं..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. कुठल्याही राज्याच्या विकासासाठी शिक्षण व्यवस्था सक्षम असं गरजेचं आहे. या अनुषंगानं महाविकास आघाडी सरकारने काही महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागास २५२५ कोटी रुपयांची रक्कम प्रस्तावित केली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

राज्यातील सर्व शाळांना इंटरनेटनं जोडण्यात येणार असून राज्यातील प्रत्येक शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण करण्याचे उद्दिष्ट महाविकास आघाडी सरकारचं आहे असंही अजित पवार यांनी सांगितलं. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांचाही दर्जा वाढवणासाठी सरकार प्रयन्त करणार आहे. तसेच मराठी माध्यमांच्या शाळांसाठी विशेष तरतूद करण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं. याच सोबत कर्नाटकात मराठी भाषा जोपासणाऱ्या शाळांना १० कोटी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

राज्यात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांतील शारीरिक कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. यापूर्वी ८ कोटींचा निधी देण्यात येत होता. बालेवाडीत आतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. कबड्डी. कुस्ती स्पर्धांना ७५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त खोखो व्हॉलिबॉल स्पर्धांनाही ७५ लाखांचा निधी या देण्यात येणार असल्याचे या यंदाच्या अर्थसंकल्पात म्हटलं गेलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धातील राज्यातील खेळाडूंच्या उत्तम कामगिरीकरिता पुण्यात ऑलिम्पिक भवन बाधायचं सुद्धा यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment