ऊसतोड कामगारांसाठी खुशखबर!! टप्प्याटप्प्यानं घरी सोडण्याची राज्य सरकारने दर्शवली तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड । लॉकडाऊनमुळे राज्यातील जवळपास 38 साखर कारखाने अंतर्गत तब्बल १ लाख 31 हजार 500 ऊसतोड कामगार विविध जिल्ह्यात अडकून पडले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अशा कामगारांना त्यांच्या घरी पोहचवावे, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांना टप्प्याटप्प्याने आपापल्या घरी सोडण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याची माहिती एका वृत्तवाहिनीला दिली आहे. दरम्यान, शासनाने याबाबतचा जीआर जारी केला असला तरी अजून शासकीय वेबसाईटवर बातमी लिहून होईपर्यंत अपलोड झालेला नाही.

शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन दिल्या आहेत. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन दिल्या आहेत.

दरम्यान, या ऊसतोड कामगारांना स्वगृही परत पाठवण्यासाठी त्यांना बाहेर काढण्यासाठी योजना आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये कामगारांची जिल्हा, तालुका आणि गावनिहाय कामगारांची संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यास सांगितली आहे. या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. ज्या ऊसतोड कामगारांचे १४ दिवस क्वॉरंटाईनचे पूर्ण झाले आहेत. अशा ऊसतोड कामगारांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्यामध्ये सर्दी-खोकला-ताप अशी कोणतीही लक्षणं नाहीत, असे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यानंतरच अशा ऊसतोड कामगारांना त्यांच्या घरी सोडण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment