महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढला; आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सध्या संपूर्ण राज्याला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रातील लोकडाऊन वाढवल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन कायम ठेवण्याची घोषणा केली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसोबत देशातील इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावा अशी सूचना पंतप्रधान मोदींना केली होती. त्यानुसार राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे, अशी घोषणा आज, शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. हा लॉकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरू राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात आहे. विषाणूची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू, असा धीरही त्यांनी राज्यातील नागरिकांना दिला.

कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवलंत तसंच यापुढेही दाखवा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत सगळ्यांनी शिस्त पाळली, धीरोदात्तपणा दाखवला आहे त्याचं कौतुक आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे तर खरं आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करते आहे. आता समोरुन रुग्ण येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईत संख्या १ हजारांवर गेली आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र ही आपल्याला फक्त कमी करायची नाही तर शून्यावर आणायची आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

महाराष्ट्रातील लॉकडाउन वाढणार? मुख्यमंत्री ठाकरे Live | Uddhav Thackeray Live | Lockdown

Leave a Comment