शिवसेना आमदारावर मतदानादरम्यान पैसे वाटल्याचा आरोप ; गाडी तपासली असता सापडली रोकड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी |शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्यावर मतदानाच्या दरम्यान पैसे वाटल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वसई विरारचे महापौर रुपेश जाधव यांनी आमदार रविंद्र फाटक यांची गाडी थांबवली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीत रोकड स्वरुपात ६० हजार सापडले आहेत. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काय पोलिसांच्या मार्फत सुरु आहे.

सेन्ट्रल पार्क परिसरात रुपेश जाधव आणि त्यांच्या कार्यकत्यांनी पैसे वाटत असल्याच्या संशयावरून रविंद्र फाटक यांची गाडी अडवली. या प्रसंगी या ठिकाणी पोलीस दाखल झाले. याच दरम्यान बहुजन विकास आघाडी आणि  शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची तयारी करू लागले. मात्र पोलीसांनी चोख बंदोबस्ताच्या जोरावर अनुचित प्रकार घडू दिला नाही.

शिवसेनेने आचार संहितेचा भंग करून निवडणुकीला वेगळे वळण लावले आहे. त्याच प्रमाणे शिवसेनेने आम्हाला कायदा हातात घ्यायची वेळ अनु नये असे वक्तव्य बहुजन विकास आघाडीचे उमेदवार  बळीराम जाधव यांनी केले आहे.

Leave a Comment