काँग्रेसमधील मुस्लिमांनी आपण किती काळ गुलाम रहायचं याचा विचार करावा – असदुद्दीन ओवेसी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या वादात आता इतर पक्षीय लोकांनीही तेल ओतायला सुरुवात केली आहे. भाजपशी जवळीक असलेल्या नेत्यांनीच सोनिया गांधींच्या आजारपणातही काँग्रेसमधील नेतृत्वबदलाच्या गोष्टी केल्या आहेत असं म्हणत सोनिया गांधींना पत्र लिहणाऱ्या २३ नेत्यांवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली.

याला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपशी संपर्क केला असल्याचं सिद्ध झालं तर राजीनामा देईन म्हणत आपली भूमिका मांडली. या एकूण प्रकरणात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आपली भूमिका ट्विटद्वारे मांडली आहे.

ओवेसी म्हणतात, “जी काँग्रेस आमच्या पक्षाला भाजपची बी टीम म्हणून हिणवत होती, त्याच पक्षाच्या माजी अध्यक्षाने पक्षातील निष्ठावान मुस्लिमांना भाजपचं हस्तक म्हटलं आहे. मी पूर्वीच सांगत होतो काँग्रेसमधील मुस्लिमांनी आता काँग्रेसची गुलामी करणं सोडलं पाहिजे.”

दरम्यान गुलाम नबी आझाद यांनीदेखील कपिल सिब्बल यांच्याप्रमाणेच माघार घेत राहुल गांधींनी कुठेच भाजपशी संबंध असल्याचा आरोप केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याशिवाय काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीतही अशी चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

या एकूण प्रकरणानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुनही मीडिया ट्रायल घेतली जातेय का? अशी शंका उपस्थित झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबिय यातून कसा मार्ग काढणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment