माढा भाजपकडे : उमेदवारीसाठी गिरीश महाजन, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात गुप्त खलबत सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  माढा विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असल्याने युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपसाठी सोडवून घेण्यास भाजपला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गिरीश महाजन आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात या मतदार संघात नेमका कोण उमेदवार द्यायचा या दृष्टीने चर्चा गिरीश महाजन यांच्या निवासस्थळी झाली आहे.

माढ्यात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी मोहिते पाटील आग्रही आहेत. तर रणजितसिंह आणि त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच पंढरपूर तालुक्याचा काही भाग माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेला असल्याने कल्याणराव काळे हे काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले नेते देखील या ठिकाणी भाजपकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत.

दरम्यान शरद पवार आणि बबन शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी संजय पाटील घाटणेकर हे असण्याची शक्यता आहे. तर शिवाजी सावंत हे शिवसेनेचे तिकीट मिळवण्यास आग्रही आहेत. परंतु माढा भाजप लढणार असल्याचे समजताच मोहिते पाटलांनी तिकिटासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे लगड करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment