बुलेट ट्रेन बासनात गुंडाळायची हीच ती वेळ! मनसे आमदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी । तब्बल एक महिन्यांच्या सत्ता नाट्यानंतर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आली आहे. शिवसेनेने आता भाजपच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आणि मंजूर केलेल्या प्रकल्पाचे परीक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह राज्यातील अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुलेट ट्रेन संबंधी थेट आव्हान केलं आहे.

‘आता ‘U”T’urn नको! बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारला द्यावे लागणारा हिस्सा व त्यासाठी बीकेसी व इतर ठिकाणी भू-संपादीत करायला लागणाऱ्या हजारो कोटी राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरावे. बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडाळायची #हीच ती वेळ आहे.’, असे ट्वीट आमदार राजू पाटील यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच कामाचा आढावा घ्यायला सुरूवात केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात अनेक पायाभूत प्रकल्प मुंबईसह राज्यभरात सुरू झाले आहेत. त्यामुळे त्या सगळ्या प्रकल्पांचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Comment