‘रस्त्यांवर सभा घेऊ द्या!’ निवडणूक आयोगाला ‘मनसे’ विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतीनिधी । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पावसामुळं रद्द झाल्यानंतर मनसेनं रस्त्यावर सभा घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयुक्तांना लिहिलं आहे. पाऊस लांबला असून, मैदानांत चिखल होत आहे. त्यामुळं सभा घेण्यात अडचणी येत आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांची पहिलीच प्रचारसभा पुण्यात होणार होती. राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. पण पावसामुळं मैदानात चिखल झाला आणि सभा रद्द करावी लागली. आता सोबतच मनसेने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी निवडणूक प्रचार सभा आयोजित केल्या आहेत. प्रचारसभांसाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक शहरांतील खासगी मैदाने आरक्षित केली आहेत. मात्र लांबलेल्या पावसामुळं आणि वादळामुळे मनसेसह सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारसभा रद्द होत आहेत. पावसाच्या पाण्यामुळं मैदानात चिखल होतो. पाऊस थांबला तरी चिखलात श्रोत्यांसाठी आसनव्यवस्था करता येत नाही, असं मनसेनं या पत्रात म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या रद्द झालेल्या सभेचाही उल्लेख केला आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारसभा पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघामधील सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानात आयोजित केली होती. मात्र, अर्धा तास पाऊस पडला आणि पावसाच्या पाण्यामुळं मैदानात चिखल झालं. पाऊस थांबूनही चिखल असल्यानं सभा रद्द करावी लागली, असं या पत्रात म्हटलं आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment