व्हॉट्सअ‍ॅप गंडले; नेटकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : जगभरात इन्स्टंट मेसेजिंगसाठी लोकप्रिय असलेले व्हॉट्सअ‍ॅप मंदावले. अनेक युजर्सना याचा फटका बसला. मेसेजसोबत व्हिडीओ आणि फोटो पाठ्वण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा प्रमाणात वापर होतो. आज दुपारी चार वाजल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप वरून व्हिडीओ आणि फोटो पाठ्वतना युजर्सना अडचणी येऊ लागल्या आहेत.काही युजर्सना टेक्स्ट मेसेजेस पाठवण्यातही अडचणी येत असल्याचे समजते. अशाप्रकारची समस्या पहिल्यांदाच उदभवली नसून या आधीही युजर्सना याच प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे.

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अशाप्रकारची समस्या उदभवल्यावर गप्प बसतील ते नेटकरी कसले. नेटकऱ्यांनी ट्विटरवरून व्हॉट्सअ‍ॅपला लक्ष्य केले. अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपला श्रद्धांजली वाहून राग व्यक्त केला.

 

Leave a Comment