बळीराजासाठी खुशखबर! यंदा १०० टक्के पाऊस पडणार- हवामान विभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शेतकऱ्यांसोबत संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी भारताच्या हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडणार असल्याचं  हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावर्षी  मान्सून सामान्य राहणार असून ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशात ९६ ते १०० टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र, कोरोनाचं संकट हे शेतकऱ्यांवरही ओढवलं आहे. याचा फार मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. देशात लॉकडाऊन आहे त्यामुळं पिकवलेलं उत्पादन विकायचं कुणाला? हा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे. लॉकडाउनचे चटके हे त्यांनाही बसत आहेत. अशा सगळ्या वातावरणात एक दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान, मे महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा हवामान विभागाकडून परिस्थितीतच अवलोकन करून भारतातील प्रांतनुसार पाऊसाच प्रमाण किती राहील याबाबत माहिती देणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

 

Leave a Comment