मध्यप्रदेशमध्ये ‘कमल’नाथ सरकार रुतलं चिखलात, भाजपचं कमळ फुलण्याच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्यप्रदेशमध्ये सुरु असलेल्या सत्तानाट्याचा अखेर अंत झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आपला राजीनामा ते थोड्याच वेळात राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे सुपूर्द करतील.

काँग्रेसचे पॉवरपॅक नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला सरकार वाचवणं अशक्य झालं होतं. बहुमत चाचणी २६ तारखेला घेण्याचा निर्णय झाल्यानंतर काहीसा दिलासा मिळालेल्या कमलनाथ यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारीच तात्काळ बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं. मात्र शुक्रवारच्या दिवशी अपेक्षित बहुमत नसल्याचं लक्षात येताच कमलनाथ यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. या एकूण नाट्यानंतर आता भाजप माध्यप्रदेशमध्ये पुन्हा सरकार बनवणार हे निश्चित झालं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा

 

Leave a Comment