खासदार जयसिद्धेश्वर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर न्यायालयाने फेटाळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आहे त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान आता सोलापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानं खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य सोलापूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.

मात्र, आज आणि रविवारी उच्च न्यायालय बंद असल्याने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अक्कलकोट नायब तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याबाबत सोलापुरातील सदर बाजार पोलिसांत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment