लोणावळा ते कर्जत लोहमार्गात बिघाड ; १३ दिवस बंद राहणार हा मार्ग ;या गाड्या राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुणे मुंबई लोहमार्गावर येणाऱ्या लोणावळा-कर्जत हा दोन रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मार्गावर दरड कोसळून मोठे नुकसान झाल्याने त्या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २६ जुलै ते ०९ ऑगस्टपर्यंत रेल्वे वाहतूक मंदावणार आहे. तसेच याच दरम्यानच्या काळात काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही गाड्या बंद देखील ठेवल्या गेल्या आहेत.

रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाल्याने या मार्गावरील सर्वच रेल्वे ट्रॅकचे दुरुस्ती काम केले जाणार आहे. त्यामुळे या काळात हा रेल्वे मार्ग बंद राहणार आहे. या काळातील गाड्यांच्या बदलाचे वेळापत्रक रेल्वे कडून जाहीर करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे

– कोयना, सह्याद्री रेल्वे गाडी पुण्यावरून सुटणार

– पुणे मार्गे भुसावळ आणि नाशिकला जाणाऱ्या गाड्यांना फटका

– पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस ८ दिवस बंद

– पुणे-भुसावळ आणि पुणे-पनवेल गाडीही राहणार बंद

– मुंबईहून सुटणाऱ्या कोयना एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाड्या मुंबईऐवजी पुण्याहून सुटणार

– डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस रद्द

– नांदेडला जाणारी गाडी मुंबई ऐवजी पुणे ते नांदेड अशी धावणार

Leave a Comment