श्रीलंकन क्रिकेटपटू मुरलीधरन वर येतेय बायोपिक ; ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू आणि फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या जीवनावर चित्रपट बनणार आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेथुपती (Vijay Sethupathi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणादेखील करण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ‘मुथय्या मुरलीधरन’च्या बायोपिकची चर्चा सुरू होती.

रमेश बाला यांनी ट्विट करत लिहिले की, ‘विजय सेथुपती आता मुथय्या मुरलीधरनच्या रुपात दिसणार आहे’. याच वृत्ताला दुजोरा देणारे ट्विट तराण आदर्श यांनी देखील केले आहे.

या बायोपिकची निर्मिती तमिळ भाषेत होणार असून, जगभरातील इतर भाषांमध्ये या चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.दक्षिणात्य अभिनेता विजय सेथुपती याचा चाहता वर्ग मोठा असून, या चित्रपटाच्या घोषणेनंतर सगळ्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment