थंडीने गारठून नागपुरात दोघांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर | गत दोन दिव्सनपासून उपराजधानीचे तापणात कमालीची घट झाल्याने कडाक्याची थंडी आहे. यासोबतच उत्तर भारतातून आलेली थंडीची लाट यामुळे नागपूरचा पॅरा ३.५ अंशावर आला आहे. यातच उघड्यावर राहणाऱ्या दोन व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीने गारठून मृत्यू झाला. सीताबर्डी आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना शनिवारी उघडकीस आल्या.

विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फूटपाथवर एका ५० ते ६० वयोगटातील अनोळखी इसम हा मृत अवस्थेत आढळला. याप्रकरणी रमीश अलीम अब्दुल (वय २८, रा. एलआयसी क्वॉर्टर) यांनी दिलेल्या सूचनेवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

त्याचप्रमाणे गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैद्यनाथ चौकाजवळच्या फूटपाथवर ४० ते ५० वयोगटातील एक व्यक्ती उघड्यावर कुडकुडताना आढळला. त्याला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. हे दोन्ही मृतदेह अनोळखी असून या दोन्ही मृतांची पोलिस ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

Leave a Comment