महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देश चालवायला ; नारायण राणेंचा संजय राऊताना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करायला हवे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. यावरुनच आता भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांना महाराष्ट्र नीट सांभाळता येत नाही आणि ते चालले देशातील दुसरी सांभाळायला, असे ट्विट करत राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांच्या पोटात एक आणि ओठात एक अस नसत. ते कधीही आडपदडा ठेवून काही बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी मांडली. देशातील बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे यानी करावे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल. नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या या विधानावरून राऊत आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला, असे नारायण राणे म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook