राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी २३ तास.. पक्षांतर केलेले घरवापसी करणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील सत्तास्थापनेचा खेळ आता चांगलाच रंगत आलेला असताना शिवसेनेची शिकार करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा आपला मार्ग मोकळा केला आहे. ताज्या माहितीनुसार राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी २३ तास दिले आहेत. राज्यपालांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राजभवनात हजेरी लावली.

याबाबत पत्रकारांना अधिक माहिती देताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले कि,’राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. सत्तास्थापनेविषयी आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करून तसेच सत्तेची गणित कशी जुळवता येतील त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ असे आम्ही राज्यपालांना सांगितले आहे.’ जयंत पाटील यांच्या प्रतिक्रियेनंतर सत्तास्थापनेबाबतच्या अनेक शक्यता तयार होताना दिसत आहेत. त्यानुसार राष्ट्रवादीतून पक्षांतर करून निवडून आलेले आमदार राष्ट्रवादीत असताना पुर्वाश्रमी खाल्ल्या मिठाला जागत पुन्हा राष्ट्रवादीला साथ देतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसेच अपक्ष आमदार, शिवसेना आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी सरकार स्थापन करू शकते. असे झाल्यास राज्यात मोठा उलटफेर पहायला मिळणार.

तत्पूर्वी राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला आमंत्रित केलं होतं. मात्र सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीने समर्थनाचे पत्रचं दिलं नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेचा दावा करण्यात तोंडावर पडली. सोबतच राज्यपालांनी सेनेला सत्तास्थापनेसाठी वाढीव अवधी देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार असताना राज्यपालांनी राष्ट्रवादीला आता सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहेत. तेव्हा आता राज्याचा सत्तासंघर्ष आणखी कोणते रंग दाखवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Leave a Comment