आमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परळी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. आमच्या बहिणीकडे औरंगाबादला दारूचा कारखाना आहे. तो कारखाना साधा सुधा नाही. ८०० कोटींचा आहे. मग पैशाला काय कमी आहे. पैशाला कमी नाही तर मग शेतकऱ्यांची देणी का अडवली आहेत असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

बंजारा समाजाच्या मेळाव्याचे आयोजन परळी येथे करण्यात आले होते. त्या मेळाव्याला संबोधित करताना धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीला दारूचा निम्मा पैसा वाटला आहे. निम्मा पैसा विधानसभेला वाटायचा आहे असे देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

पंकजा मुंडे सहा आठ इथे येतात. येऊन बचत गटाच्या महिलांना नादी लावले जाते, दुष्काळात गायी वाटल्या जात आहेत. गायी चारा आणि खुराक , निघालेलें दूध याचा ताळमेळ बसत नसताना त्यांत दुधाला भाव कमी आहे. दुष्काळात खायला चारा नाही आणि गायी वाटप सुरु आहे. मायबाप शेतकऱ्याला आहे ती जनावरं संभाळनं होतं नाही. त्याला आगोदर चारा द्या असे म्हणत बिसलरीच्या पाणी बॉटल ची किंमत जास्त आहे मात्र दुधाचा भाव कमी त्यामुळे आगोदर दुधाचा भाव वाढवा अशी मागणीही धनंजय मुंडें यांनी केली.

Leave a Comment