“महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही”- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई  । “महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केलं. . ‘सीएनएन न्यूज १८’ वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. “महाविकास आघाडीतील सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहिल्यानंतर या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे जावं यावर सर्वांचं एकमत झालं,” अशी माहितीही पवार यांनी बोलाताना दिली.“धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतच आहे. तसंच निर्णय घेताना ते सर्व सहकाऱ्यांनाही विश्वासात घेतात. त्यांनी एका ठिकाणी बसून काम करण्यात काही वाद नाही. परंतु त्यांनी थोडं फिरायलाही हवं,” असं मतंही यावेळी शरद पवार यांनी यावेळी बोलून दाखवलं.

देवेंद्र फडणवीसांना सरकार पाडण्याची घाई
सध्या कोणताही नवा पर्याय नसल्यामुळे महाविकास आघाडीचं हे सरकार पाच वर्षे चाचेल. देवेंद्र फडणवीस हे आता कमालीचेच अस्वस्थ झाले असून त्यांना सरकार पाडण्याची घाई झाली आहे. परंतु सद्यस्थितीत निवडणूक कोणालाही नको असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अजित पवारांची गरज मंत्रालयात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची मंत्रालयात अधिक गरज आहे. राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख यांना बाहेर फिल्डवर काम करण्याची गरज असल्याचंही शरद पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment