अजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा फटका आता राजकिय नेत्यांनाही बसल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना कोरोना झाल्याची बातमी ताजी असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोना संसर्ग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. तटकरे यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. सुनील तटकरे मुंबईतील कोरोना रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोनातून लवकर बरं होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे, असं तटकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनाही यापूर्वी कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. अजित पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर फडनवीसांवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दोघांचीही प्रकृती आता उत्तम आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook